Breaking News

उरण येथून 92 जणांना घेऊन उत्तर प्रदेशला जाणार्या ट्रकवर कारवाई

उरण : प्रतिनिधी  – कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, राज्यात विविध ठिकाणी रोजगाराच्या निमित्ताने परराज्यातील मजूरांनी या संसर्गजन्य विषाणू फैलावाच्या भितीने व त्यांना  सध्या काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारी कोसळल्याने त्यांनी त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.त्यांना जाण्यासाठी कोणत्याही प्रकारे वाहनांची व्यवस्था नसल्याने एका ट्रकमध्ये 92 व्यक्तींना एकत्रित गर्दीमध्ये कोंबून त्यांचे उरण येथून मूळगावी उत्तरप्रदेश येथे घेऊन जात असल्याची खबर उरण पोलिसांनी मिळताच बोकडविरा येथील वायू विद्युत केंद्राजवळ हा ट्रक पोलिसांनी अडवून त्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार कोरोना संसर्गाच्या भितीने व हाताला काम नसल्याने लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या उत्तरप्रदेश राज्यातील मजुरांना त्यांच्या मूळगावी 92 इसमांना घेऊन जाणारा ट्रक उरण पोलिसांनी बोकडविरा वायू विद्युत केंद्राजवळ अडवून तपासणी केली असता, एमएच 46 – एफ 2832 या क्रमांकाच्या ट्रकमध्ये तब्बल 92 व्यक्तींना कोंबून तीन ते साडेतीन दिवसांच्या अंतरातील प्रवासासाठी बेकायदेशीरपणे काल रात्री 11 वाजताचे सुमारास निघाले असल्याचे निदर्शनात आले. या वेळी सर्व मजुरांना संबंधित ट्रकमधून उतरवून माघारी पाठविण्यात आले.

त्यामुळे ट्रक चालक नियादुल्ला मनसबअली खान(30) व मालक रमजानअल्ली मोहम्मद यासिन खान(45)दोघेही रा.मोरा रोड, बोरीनाका, उरण या दोघांविरोधात कोरोना प्रादुर्भावाचे अनुषंगाने लोकांची सुरक्षितता धोक्यात आणून जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी रायगड यांचे कोरोना 2020 आदेशाचा भंग केल्या प्रकरणी कोविड-19 या रोगाचा प्रसार पसरविण्याचे दृष्टीने घातक कृती केल्याबाबत त्यांचे विरोधात भा. दं. वि. 188, 269, 270, 271 कलमन्वये कारवाई करून, सीआरपीसी कलम 41(अ) (1) अन्वेय समजपत्र देण्यात आले आहे. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. जी. कावळे अधिक तपास करीत आहेत.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply