Breaking News

रोहा-कोलाड रस्त्यात धुळीचे साम्राज्य

प्रशासनाचे दुर्लक्ष; प्रवाशांना नाहक त्रास

धाटाव : प्रतिनिधी

रोहा-कोलाड रस्ताची अवस्था दिवसेंदिवस बिकट व त्रासदायक ठरत आहे. या रस्त्यावरून रोज हजारो वाहने प्रवासी घेऊन ये-जा करीत असतात. रस्तावर जागोजागी खड्डेच खड्डे पडले आहेत, परंतु ठेकेदाराने हेच खड्डे निकृष्ट दर्जाचे भरल्यामुळेच सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले असल्याचे दिसून येते. सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्यात कुठलाही समन्वय नसल्याचे दिसत नाही.

आज जे रस्तावर जे धुळीचे लोट दिसून येते याला पुर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार जबाबदार असल्याचे प्रवासी वर्गात बोलले जात आहे. त्यामुळे याची काळजी न घेतल्यामुळे दोघेही एकमेकांच्या वर ढकलत असल्याची कुजबूज नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे. याच रस्त्याची आताची जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला बांधकाम विभाग जबाबदार आहेत.  पूर्णतः  अपयशी ठरलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी या गंभीर नेहमीच समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्या ऐवजी फक्त या खडयात मातीसारखी कच टाकून तात्पुरती मलमपट्टी आजवर केली आहे. रस्तावर नेहमीच खड्याचे साम्राज्य असून असे वाटते कि, हा रस्ता खड्यांचा अड्डा असल्याचे समजते, हे खड्डे भरण्यासाठी वरच्यावर कच हातररून पसरवली दिसत आहे.

या रस्त्यावरून कामगार, प्रवासी वर्ग वाहनाची वर्दळ सुरू असते. रस्तालगत अनेक छोटे मोठे धंदेवाले व्यवसाय करत आहेत त्यामुळे त्यांना या धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आधीच खड्डेच खड्डे, त्यात वाहन चालवताना खड्डा चुकवायचा कि धुळीचा सामना करावा त्यामुळे वाहक व प्रवासी यांना भलत्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. धुळ घश्यामध्ये जात असल्याने त्याचा परिणाम थेट आरोग्यावर होणार  असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे धुळीचा प्रश्न मार्गी लावून लवकरात लवकर रस्ता पुर्ण करण्याची मागणी प्रवासी, कामगार वर्गांनी केली आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply