Breaking News

नवभारतीय शिववाहतूक संघटना चालकांच्या खंबीरपणे पाठीशी -लोकनेते रामशेठ ठाकूर

रिक्षाचालकांना अन्नधान्य आणि सुरक्षित पडदा अंतर किटचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त
उलवे नोड परिसरातील रिक्षाचालकांना अन्नधान्य वाटपाबरोबरच त्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षित पडदा अंतर किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन नवभारतीय शिववाहतूक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष निर्गुण कवळे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवाभावीपणाने केले आहे. अशा संघटनेचा आम्हाला निश्चित अभिमान असून, यापुढेही येथील रिक्षाचालक तसेच इतर वाहनचालकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी या संघटनेचे पदाधिकारी खंबीरपणे उभे राहतील, असा विश्वास
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला.
राज्यभरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरूच आहे. लॉकडाऊन काळात रिक्षाचालकांचेही नुकसान झाले असून, त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपप्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटना उलवे नोड-खारकोपरच्या वतीने रिक्षाचालकांना अन्नधान्य तसेच कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये याकरिता सुरक्षित पडदा अंतर किटचे वाटप लोकनेते रामशेठ ठाकूर, संघटनेचे अध्यक्ष हाजी अरफात शेख आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या वेळी निर्गुण कवळे यांनी सुरू केलेल्या नरेंद्र एंटरप्रायझेस कार्यालयाचे उद्घाटन शेख यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते.  
लोकनेते रामशेठ ठाकूर आणि येथील आमदार महेश बालदी हे उलवे नोड परिसरातील जनतेच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते तथा भाजपप्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष निर्गुण कवळे हेही आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने येथील जनसामान्यांच्या, वाहनचालकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहेत. याबद्दल हाजी अरफात शेख यांनी समाधान व्यक्त केले.
आमदार महेश बालदी यांनी या समाजोपयोगी व स्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल हाजी अरफात शेख तसेच निर्गुण कवळे आणि नवभारतीय शिववाहतूक संघटनेचे पदाधिकारी यांचे कौतुक केले तसेच कवळे यांच्या नवीन व्यवसायाला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, नवभारतीय शिववाहतूक संघटनेचे राज्य सरचिटणीस तन्वीर जोड, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, संघटनेचे जिल्हा चिटणीस साईचरण म्हात्रे, तालुका उपाध्यक्ष सतीश पाटील, राजू घरत, चिटणीस योगिराज पाटील, कोपर अध्यक्ष सुधीर ठाकूर, उलवे नोड शहराध्यक्ष राजू स्वामी, महेंद्र पाटील, सुजित पाटील, सिद्धेश कवळे, उरण तालुका उपाध्यक्ष विकी पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply