Breaking News

खोपोलीत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ कागदावरच

लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

खोपोली : प्रतिनिधी – शासनाच्या एखाद्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची वाट कशी लावायची याचे उत्तम उदाहरण खोपोलीत सध्या दिसत आहे. कोरोना काळात सर्वांची आरोग्य तपासणी व सर्वेक्षण व्हावे, यासाठी मोठा गाजावाजा करून राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजने तंर्गत आरोग्य सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत आहे. खोपोली नगर परिषद क्षेत्रात मात्र हे अभियान राबविण्यात प्रशासकीय उच्चस्तर ते शेवटच्या टोकावर मोठी उदासीनता असल्याचे स्पष्ट होत आहे.

खोपोली नगरपालिका क्षेत्रात यासाठी एकूण 30 पथके तयार करण्यात आली आहेत, मात्र ही पथके सक्रिय किती हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पथकातील कर्मचारी अचानक शहरातील एखाद्या परिसरात येतात, दोन चार कुटुंबांना भेटतात त्यांच्याकडून घरात कोणी आजारी आहे का? घरात कोणाला कोरोना लक्षणे आहेत का? घरात कोणी कोरोना रुग्ण आहे का? यापूर्वी असा रुग्ण झाला आहे का? अशी माहिती विचारतात. महत्त्वाचे म्हणजे नियमानुसार तापमान, ऑक्सिजन लेव्हल असे काहीही परीक्षण करण्यात येत नाही. पथकात कधीही पूर्ण सदस्य नसतात. स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्याकडून अधिकृत प्रतिनिधी तर कोणत्याही पथकात उपस्थित आढळून येत नाही. वरिष्ठ अधिकार्‍यांकडूनही प्रत्यक्षात काय होत आहे, याबाबतची माहिती फिल्डवरून घेण्यात येत नाही.

यामुळे आरोग्य सर्वेक्षणाचे काम निव्वळ कागद रंगवण्यासाठी सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. फिल्डवर अंधार असला तरी खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे  ही मोहीम गांभीर्याने सुरू असून, यात कामचुकारपणा केल्यास कडक कारवाई होईल, असे त्यांच्या कार्यालयातूनच सांगत आहेत. या अभियानात दररोजचा अहवाल घेण्याशिवाय शहराच्या आरोग्य अधिकारी डॉ. संगीता वानखेडे यांचा कोणताही थेट सहभाग दिसून येत नाही.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply