Breaking News

नागोठण्यात तुफान पर्जन्यवृष्टी; भातशेती धोक्यात

नागोठणे : प्रतिनिधी

चित्रा नक्षत्रास प्रारंभ होताच शनिवारी (दि. 10) दुपारी दोन वाजल्यापासून वातावरणात अचानक बदल होऊन नागोठणे परिसरात पावसाचे विजांच्या कडकडाटासह आगमन झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अर्धा ते पाऊण तास तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतात कापणी केलेल्या भातपिकाला धोका पोहोचला असून, तयार धान्य भिजून गेले आहे. त्यामुळे हातात आलेले पीक या पावसामुळे कितपत शिल्लक राहील, याची शेतकरी वर्गामधून चिंता व्यक्त केली जात आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply