नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांच्या मागणीला यश
पनवेल : रामप्रहर वृत्त
नवीन पनवेल येथील सेक्टर-12, 13, 14, 15 बांटिया शाळा दत्त मंदिर ते कालिमाता मंदिर या ठिकाणी नवीन मोठी गटारे बांधण्याची कामांना सुरुवात करण्यात आली आहे. भाजप नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे (प्रभाग क्र.17‘क’) यांनी यासंदर्भात सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत काम सुरू करण्यात आले.
नगरसेविका वाघमारे यांनी दिलेल्या मागणीमध्ये म्हटले होते की, नविन पनवेल सेक्टर-12, 13, 14, 15 बांटिया शाळा दत्त मंदिर ते लिमाता मंदिर या ठिकाणी पावसाचा जोर वाढल्यावर पावसाच्या पाण्याचा निचरा योग्यप्रमाणे गटारामध्ये होत नाहीत. आपले अधिकारी यांनी पाहणी केली असता असे पाहणीत आले या ठिकाणी पावसाचे पाणी गटारामधून जोराने वाहून जात नाहीत. त्यामुळे तेथिल प्रचंड प्रमाणात पावसाचे पाणी साचून राहते असेच पाणी साचून राहिले तर तेथील रहिवासींच्या घरात पाणी शिरून पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता दिसून येते. त्यामुळे भविष्यामध्ये अशीच परिस्थिती राहिल्यास या ठिकाणी पूर येउन वित्त व जिवित हानी होऊन नुकसान होण्याचे दिसून येते त्यामुळे त्यावर कायमस्वरूपी नियोजन करणे गरजेचे आहे.
लवकरात लवकर सेक्टर 12, 13, 14, 15 बांटिया शाळा दत्त मंदिर ते कालिमाता मंदिर या ठिकाणी दोन्ही बाजूस नव्याने मोठी गटारे बांधण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार कामांना सुरूवात करण्यात आली.