Breaking News

स्वराज्य सोशियल वेल्फेअर ऑर्गनायझेशनकडून नांदगाव शाळेस मदत

कर्जत : बातमीदार

निसर्ग चक्रीवादळात कर्जत तालुक्यातील अनेक शाळांच्या इमारती क्षतीग्रस्त झाल्या होत्या. छतांचे पत्रे आणि कौल उडून नुकसान झाले होते. शासकीय मदत मिळण्यास उशीर होत असल्याने तालुक्यातील दुर्गम भागातील काही शाळांची दुरुस्ती करण्यास सेवाभावी संस्था धावून आल्याने या शाळांच्या इमारती नव्याने उभ्या राहिल्या आहेत.

कर्जत तालुक्यातील नांदगाव येथील मराठी शाळेच्या इमारतीचे निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र चार महिने उलटून गेले तरी शासनाकडून कोणत्याही स्वरूपाची मदत मिळाली नाही. शेवटी केंद्रप्रमुख गोविंद दरवडा यांनी भागूचीवाडी शाळेचे मुख्याध्यापक आढारी सरांच्या संपर्कात असलेल्या संस्थेच्या माध्यमातून काही मदत मिळावी, या साठी संपर्क केला. ज्या संस्थेने रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शाळांच्या दुरुस्तीचा विडा उचलला आहे, अशा मुंबईतील स्वराज्य सोशियल वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेने मदतीची तयारी दर्शवली.  त्यांना क्षतीग्रस्त नांदगाव शाळेचे फोटो व मागणी पत्र पाठविले. संस्थेच्या पदाधिकार्‍यांनीही विलंब न लावता शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. छताची पडझड झालेल्या या शाळेस 65 सिमेंट पत्रे व 20 ढापे देऊन शाळेच्या छप्परची दुरुस्ती करून दिली. या कामासाठी संस्थेस जॉय ऑफ हॅप्पीनेस ने मदत केली.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply