पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील नागझरी येथे एल एस आर स्पेश्यालिटी ऑईल्स प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या 68 लाख रुपयांच्या सीएसआर फंडातून अंगणवाडी बांधण्यात आली आहे. या आंगणवाडीचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते सोमवारी झाले.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आंगणवाडीचे चांगले बांधकाम आणि उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच आंगणवाडीच्या भिंतीवर मुलांना जगाचे ज्ञान मिळेल अश्या प्रकारची सर्वसमावेशक माहिती भिंतीवर रेखाटण्यात आल्याबद्दल पेंटींगचे काम करणार्याचे कातुक करुन त्यांना 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
या अंगणवाडीच्या उद्घाटनावेळी भाजपनेते एकनाथ देशकर, कृष्णा शेठ पाटील, भाजपचे उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, प्रकाश खैरे, अशोक साळुंखे, महेश पाटील, नितेश पाटील, अरविंद गोंधळी, पनवेल तालुका उत्तर युवा मोर्चा अध्यक्ष आशिष कडू, निवृत्ती म्हात्रे, भारत मात्रे, रुपेश म्हात्रे, श्रीनाथ पाटील, अतुल पाटील, मेघनाथ पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…
चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …
RamPrahar – The Panvel Daily Paper