मोहोपाडा, खालापूर ः प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील मोहोपाड्याजवळील कांबे गावात तब्बल 11 फुटी अजगर आढळला. त्याला सर्पमित्राने सहकार्यांच्या साथीने पकडून जीवदान दिले.
कांबे गावात अजगर असल्याची माहिती मिळताच खोपोली-खालापूर येथील स्नेक रेस्क्युअर्सच्या टीमचा सदस्य असलेला सर्पमित्र अक्षय गायकवाडने सहकार्यांसोबत घटनास्थळ गाठले. आपल्याकडे सर्वसाधारपणे सहा ते आठ फुटापर्यंत अजगर आढळत असतो, मात्र हा त्या तुलनेत मोठा आणि वजनदारदेखील होता. प्रचंड ताकद लावूनदेखील अजगर पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करीत होता. अखेर अक्षय व त्याचे सहकारी अभिजित घरत, रोहिदास मसणे, योगेश शिंदे, नवीन मोरे यांनी या महाकाय अजगराला पकडले. त्यानंतर त्याला खालापूर तालुका वनविभागाच्या निर्देशानुसार सुरक्षित वनक्षेत्रात सोडून देण्यात आले.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper