पनवेल ः रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 25) नव्या 114 कोरोना रुग्णांची आणि तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 168 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 81 व ग्रामीण 18) तालुक्यातील 99, उरण चार, अलिबाग तीन, पेण व रोहा प्रत्येकी दोन, तर खालापूर, कर्जत, सुधागड, म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. मयत रुग्ण पनवेल मनपा दोन, अलिबाग तालुक्यात एक असे आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता 53,209 आणि मृतांची संख्या 1,525 झाली आहे. 49,950 जण कोरोनामुक्त झाल्याने 1,734 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper