Breaking News

‘नवी मुंबई-मांडवा-गेट वे’ सहा महिन्यांत होणार सुरू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – नेरूळ खाडीतील जेट्टीचे काम अंतिम टप्यात आले असून येत्या मार्च महिन्यात नेरूळ-गेट वे ऑफ इंडिया-मांडवा अशी जलवाहतूक सुरू होणार आहे. ही जलवाहतूक सुरू होणार असल्याने दोन तासाचे अंतर आवघ्या आर्धा तासावर येणार आहे. नवी मुंबईकरांचे समुद्रमार्गाने जलवाहतुकीने मुंबईत किंवा अलिबागला प्रवास करायचे स्वप्न येत्या सहा महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

नेरूळ खाडीमध्ये उभे राहत असलेल्या जेट्टीचे काम 2018 मध्ये सुरू करण्यात आले होते. मुंबई आणि मांडवाला जोडणार्‍या जलमार्गाचा नवी मुंबईतील थांबा नेरूळ खाडीमध्ये उभा राहत आहे. 111 कोटी खर्च करून उभा राहत असलेल्या नेरूळ जेट्टीचे काम पर्यावरण परवानग्यांमुळे आणि कोरोनामुळे रखडले होते. या प्रकल्पाच्या पाहणीसाठी सिडको एम. डी. संजय मुखर्जी आले होते. त्यांनी भेट देत आढावा घेतला.

वनविभागाच्या परवानगीसाठी 18 महिन्यांचा कालावधी लागला असला तरी आता सर्व परवानग्या पूर्ण झाल्या आहे. मार्चपर्यंत काम पूर्णत्वास नेवून ही जेट्टी मेरिटाईम बोर्डाला हॅन्ड ओव्हर करणार आहे.

– संजय मुखर्जी, एमडी, सिडको

नागरिकांचा प्रवास होणार सोपा

नवी मुंबईतून मुंबई, अलिबागला जाण्यासाठी लोकल किंवा रस्तेमार्गाने जाण्यासाठी सध्या दीड-दोन तासाचा अवधी लागतो. मात्र या मार्गाने जलवाहतूक सुरु झाल्यानंतर नागरिकांसाठी हा प्रवास सोपा होणार आहे. आता येत्या मार्च मध्ये जेट्टीचे काम पूर्ण होऊन जलवाहतूक सुरू होणार असल्याने अवघ्या आर्धा तासात गेट वे ऑफ इंडिया आणि मांडवा येथे पोहचता येणार आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply