कर्जत : बातमीदार
तालुक्यातील वर्णे ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेच्या रंगहीन भिंतीवर मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन काढली असून, त्यांच्या या आगळ्यावेगळ्या कल्पकतेची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
वर्णे ठाकूरवाडी येथे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शाळा असून, तेथे आदिवासी समाजातील मुले शिक्षण घेत आहेत गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यांच्या प्रेरणेतून व केंद्र प्रमुख नलिनी साळोखे यांच्या सहकार्याने वर्णे ठाकूरवाडी येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी लॉकडॉऊनच्या काळात शाळेचा कायापालट केला आहे.शाळेत चित्रकला शिक्षक नसतानाही मुख्याध्यापक ज्ञानेश्वर वाडीले व शिक्षक मित्र श्रीकृष्ण सुपे, श्रीकृष्ण लोहारे, विजय चौरे, खंडू कावळे यांनी शाळेच्या भिंतीवर वारली चित्रे काढली आहेत. तसेच भारतात बुलेट ट्रेन येण्या अगोदरच या शिक्षकांनी आपल्या शाळेत बुलेट ट्रेन रेखाटली आहे. त्यामुळे शाळेचे व शिक्षकांचे कौतुक होत आहे.