Breaking News

मुंबईत हाय अलर्ट!; दहशतवादी हल्ल्याची शक्यता; ड्रोनला बंदी

मुंबई : प्रतिनिधी

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. गुप्तचर विभागाकडून याबाबतची माहिती राज्य सरकारला पत्राद्वारे देण्यात आली आहे. त्यानंतर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, संपूर्ण शहरात ड्रोन तसेच तत्सम गोष्टींच्या वापरास मनाई करण्यात आली आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी मुंबईत गर्दीच्या ठिकाणांना आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना लक्ष्य करू शकतात.  ड्रोन, रिमोटवरील मायक्रो लाइट एअरक्राफ्ट, मिसाइल, पॅराग्लायडरद्वारे हा हल्ला होऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून ड्रोन तसेच तत्सम गोष्टींच्या वापरावर 30 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यावर कलम 188 अतंर्गत कारवाई होऊ शकते. त्याचप्रमाणे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून 18 दहशतवाद्यांची यादी जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

केंद्रीय गृह मंत्रालयाने दहशतवाद्यांविरोधात मोठे पाऊल उचलत बेकायदा कृत्यविरोधी दुरुस्ती विधेयक (यूएपीए) अंतर्गत 18 दहशतवाद्यांची यादी मंगळवारी (दि. 27) घोषित केली. यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या अनेक सहकार्‍यांची नावे आहेत. छोटा शकील, टायगर मेमन यांचाही या यादीत समावेश आहे. शिवाय पाकिस्तानस्थित असलेल्या दहशतवाद्यांचीदेखील जंत्री समाविष्ट आहे.हे आहेत दहशतवादी साजिद मीर, युसूफ भट्ट, अब्दुर रहमान मक्की, शाहीद महमूद (सर्व लष्कर-ए-तोयबा),  फरहातुल्लाह गोरी, अब्दुल रऊफ असगर, इब्राहीम अतहर, युसूफ अजहर, शाहीद लतीफ, मोहम्मद युसूफ शाह, गुलाम नबी खान (हिजबुल मुजाहिद्दीन), जफर हुसैन भट्ट, रियाज इस्माइल, मोहम्मद इकबाल, छोटा शकील, मोहम्मद अनिस, टायगर मेमन व जावेद चिकना.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply