Breaking News

मेडिकल कॉलेज प्रवेशावरून फसवणूक

पनवेल ः बातमीदार

मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक पालकांकडून लाखो रुपये रक्कम उकळणार्‍या महेश अदाटे याच्या विरोधात खांदेश्वर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या भामट्याने खारघरमधील एका व्यक्तीकडून प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने तीन लाख 50 हजार रुपये उकळल्यानंतर त्याचा प्रताप उघडकीस आला.

दीपक चावला हे खारघरमध्ये राहण्यास असून त्यांच्या मुलीने गेल्या वर्षी बारावी पास झाल्यानंतर दंतचिकित्सा शस्त्रक्रिया (बीडीएस) या वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी सीईटी व नीट या प्रवेश परीक्षा दिल्या होत्या. तिला या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने बीडीएससाठी प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे चावला यांनी खारघरमधील भारती विद्यापीठमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. या दरम्यान, सांगलीतील विटा भागात राहणारा महेश अदाटे भारती विद्यापीठामध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देत असल्याची माहिती दीपक चावला यांना त्यांच्या नातेवाईकांनी दिली. मुलीच्या प्रवेशासाठी अदाटे याला सुरुवातीला तीन लाख 50 हजार रुपये द्यावे लागतील, असेही नातेवाईकांनी सांगितले होते, मात्र त्यांची फसवणूक झाली. आता तो पैसे देण्यास टाळाटाळ करीत असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply