Breaking News

मद्यसम्राट मल्ल्याच्या उलट्या बोंबा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : देशभरातील विविध बँकांना कोट्यवधींचा गंडा घालून परदेशी पळालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याभोवती भारतातील तपास यंत्रणांनी आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केल्यामुळे विजय मल्ल्याचे धाबे दणाणले आहेत. नऊ हजार कोटींच्या बदल्यात जगभरातील माझी 14 हजार कोटींची संपत्ती जप्त केली, तसेच मी ब्रिटनचा नागरिक असून सध्या तिथेच राहत आहे, मग तरीही मला फरार आरोपी कसे म्हणता? अशा उलट्या बोंबा मारण्यास विजय मल्ल्याने सुरुवात केली आहे.  हा मूर्खपणाचा सवाल विजय मल्ल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका मुलाखतीचा दाखला देताना त्याने सरकारवर खोटा आरोप केला आहे.

मल्ल्या ट्विटमध्ये म्हणतो की, मोदींनी आपल्या एका मुलाखतीत म्हटलंय की, त्यांच्या सरकारने माझ्यावरील 9 हजार कोटींच्या कर्जाच्या बदल्यात 14 हजार कोटींची संपत्ती जप्त केली आहे, मग आता मी आरोपी कसा? तसेच मी 1992पासून ब्रिटनचा रहिवासी असून सध्या तिथचं आहे मग मी फरार कसा? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत मल्ल्याचा उल्लेख करीत म्हटले होते की, देशातून नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यासाठी पळून गेले कारण सरकारने कठोर कायदे बनवले होते. आम्ही मल्ल्याची कर्जापेक्षा अधिक संपत्ती जप्त केली आहे. मल्ल्याचे कर्ज 9 हजार कोटींचे होते, मात्र आम्ही जगभरातील त्याची 14 हजार कोटींची संपत्ती जप्त केली आहे. यापूर्वीही लोक घोटाळे करून देशातून पळून जात होते, मात्र त्यावेळचे सरकार त्यांची नावेही जाहीर करीत नव्हते. आम्ही तर त्यांच्याविरोधात कारवाई सुरू केली. त्यामुळे त्यांना पळून जावे लागले. मल्ल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या याच विधानावर आक्षेप घेतला आहे.

मल्ल्याने म्हटले की, भारतात माझी प्रतिमा एका पोस्टर बॉयप्रमाणे बनवण्यात आली आहे. मी नुकतीच मोदींची मुलाखत पाहिली. यामध्ये मोदी माझे नाव घेऊन म्हणताहेत की, माझ्यावर 9 हजार कोटींचे कर्ज आहे, मात्र सरकाने माझी 14 हजार कोटींची संपत्ती जप्त केली आहे. म्हणजे हे सिद्ध होते की मी जेवढे कर्ज घेतले आहे त्याची परतफेड झाली आहे. तरीही मला आरोपी म्हटले जाते, तसेच दुसर्‍या ट्वीटमध्ये त्याने म्हटले की, मी 1992पासून ब्रिटनचा नागरिक आहे, मात्र तरीही या सत्याकडे दुर्लक्ष करीत मला फरार घोषित करण्यात येत आहे. दरम्यान, ब्रिटनमधून विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय तपास पथके सातत्याने प्रयत्नशील आहेत.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply