Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भाजप सोशल मीडिया सेलच्या पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्ष सोशल मीडिया सेल अंतर्गत पनवेल शहर, कामोठे आणि खारघर-तळोजा मंडलातील पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, त्यांना भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 1) नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास भाजप जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, सोशल मीडिया जिल्हा सहसंयोजिका मोना आडवाणी, महाराष्ट्र प्रदेश सदस्य चांदणी अवघडे, भाजप खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, उद्योग आघाडी संयोजक राजेंद्र मांजरेकर, पनवेल ग्रामीण मंडल सहसंयोजक चेतन कांबळे आदी उपस्थित होते. या वेळी सोशल मीडिया सेलच्या पनवेल संयोजकपदी प्रसाद हनुमंते, सहसंयोजकपदी मनोज पाटील, सदस्यपदी शार्दूल अमृते, संतोष सूर्यकांत, सचिन नाझरे, रूपेश नागवेकर, निलेश भगत, योगेश हाडगे, उदित जेठवा, रूपेश घाग, प्रशांत भुजबळ, नवनाथ मेंगडे; कामोठे संयोजकपदी प्रवीण वाघमारे, सहसंयोजकपदी शेखर जगताप, सदस्यपदी अ‍ॅड. सविना कुलाल, अ‍ॅड. अटलबिहारी वाजपाई, मनोज मडाले, सुनीता शर्मा, सुयोग वाफारे, अलोक वाजपाई, संगमेश जिरोबे, रणजित मिश्रा आणि खारघर संयोजकपदी अजय माळी, सहसंयोजक पदी गहिनीनाथ नावडेकर, कांचनकुमार बिर्ला व सदस्य म्हणून स्नेहल वाधई मुस्सरत अन्सारी, मनोज कुमार, योगी कोठारी, विकास विकुंभ, अजय मेधपल्लिकर, प्रशांत लवाटे, बळीराम पोटाले यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दुडमसूर्या यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले.

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply