भाजप महिला मोर्चा पनवेल शहर मंडलच्या पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्रे प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या पनवेल शहर मंडलाची कार्यकारिणी बैठक उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 2) झाली. या बैठकीत पनवेल शहर मंडलमधील महिलांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत महिला मोर्चा पनवेल शहर मंडल अध्यक्ष वर्षा नाईक, सरचिटणीस सपना पाटील, उपाध्यक्ष नीता माळी, सुहासिनी केकाणे, सचिव दिपाली बांद्रे, स्नेहल खरे, कोषाध्यक्ष आदिती मराठे, सदस्य मनीषा चिले, अंजली इनामदार, सुहासिनी शिवणेकर, नीता घाटुगडे, नंदा टापरे, अनिता रणदिवे, मनिषा बहिरा यांची नियुक्ती होऊन त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. या बैठकीला माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत, प्रभाग समिती ‘क’च्या सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेविका वृषाली वाघमारे, राजेश्री वावेकर, सोशल मीडिया संयोजिका गायत्री परांजपे, जिल्हा उपाध्यक्ष संध्या शारबिंद्रे, उद्योग आघाडी सदस्य अभिलाषा ठाकूर, भाजप शहर सरचिटणीस अमरिश मोकल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उत्तर रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चाची उद्या आढावा बैठक; प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे, आमदार प्रशांत ठाकूर

यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : उत्तर रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चाची आढावा बैठक तसेच नियुक्तिपत्र प्रदान कार्यक्रम गुरुवारी (दि. 5) सकाळी 10 वाजता महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमाताई खापरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणार्‍या या कार्यक्रमास महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष व कोकण विभाग प्रभारी नीलम गोंधळी, प्रदेश सरचिटणीस अश्विनी जिचकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, सरचिटणीस दर्शना भोईर, मृणाल खेडकर यांनी दिली तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.

Check Also

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami W dzisiejszym artykule skupimy się na tym, …

Leave a Reply