Breaking News

नेरे आरोग्य केंद्रात जनजागृती

पनवेल : वार्ताहर

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त असंसर्गजन्य रोग प्रतिबंध जागरूकता अभियान 2019 अंतर्गत, मुख, स्तन व गर्भाशयमुखाच्या कॅन्सरबद्दल डॉ. शुभदा नील यांनी तालुक्यातील नेरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे

मार्गदर्शन केले.नवी मुंबई येथील सुप्रसिध्द स्त्रीरोग व कॅन्सरतज्ज्ञ, वेलनेस ऑफ वूमन-एक पाऊल कॅन्सर मुक्तीकडे या फॉगसी व ब्रह्माकुमारीज प्रोजेक्टच्या राष्ट्रीय संयोजक बीके डॉ. शुभदा नील यांनी मुख, स्तन व गर्भाशयमुखाच्या कॅन्सरबद्दल माहिती दिली व आवश्यक ते मार्गदर्शन केले. 60हून अधिक आशा सेविका, मेडिकल ऑफिसर, नर्सेस यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या उपक्रमाबद्दल समाधन होत आहे.

Check Also

पनवेलच्या श्लोकची आंतरराष्ट्रीय भरारी!

‌‘३:३०‌’ लघुपटाची प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हल्समध्ये निवड; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कौतुक व शुभेच्छा पनवेल : …

Leave a Reply