Thursday , March 23 2023
Breaking News

उरण तालुक्यात भाजपला भरती

विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश

उरण ः रामप्रहर वृत्त

उरण तालुक्यात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन विविध गावांतील कार्यकर्ते भाजपच्या विकास प्रवाहात सहभागी होऊ लागल्याने तालुक्यात भाजपला भरती येऊ लागली आहे. रविवारी चारफाटा आणि बोकडवीरा गावातील कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. या सर्वांचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनी स्वागत केले, तसेच या सर्वांचा योग्य तो सन्मान राखण्याची ग्वाहीही दिली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच हे पक्षप्रवेश सुरू असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

बोकडवीरा येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यासही तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, नव भारतीय शिववाहतूक संघटनेचे विकी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. बोकडवीरा येथील ईश्वर हिरामण पाटील, रिचा ईश्वर पाटील, शिवकुमार हिरामण पाटील, नितुला शिवकुमार पाटील यांनी पक्षप्रवेश केला.

चारफाटा येथील कार्यकर्ते दाखल

चारफाटा येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यास तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, नवभारतीय शिववाहतूक संघटनेचे विकी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

चारफाटा येथील पक्षप्रवेश करणारे कार्यकर्ते ः मोतिराम राठोड, बेबीताई राठोड, नितीन राठोड, सचिन गुढे, योगिता गुढे, वैशाली गुढे, राजू शेवाळे, दुर्गा शेवाळे, मंगल शेवाळे, अस्मिता शेवाळे, इंदूबाई शेवाळे, कलाबाई शेवाळे, ताईबाई शेवाळे, आशिष शेवाळे, गंगा शेवाळे, ताई शेवाळे, रवीताई शेवाळे, नतुशा शेवाळे, अनिता शेवाळे, रंगी काळे, रतन काळे, मीना काळे, शिना काळे, संजू काळे, कमल काळे, चंद्रजीत काळे, अजेश शेवाळे, गुरुबाई शेवाळे, विजय शेवाळे, ताईबाई शेवाळे, स्वामी गुडे, दुर्गा गुडे, शालू गुडे, पंडित गुडे, गंगूबाई गुडे, शिवा गुडे, राजू गुडे, सुनीता गुडे, गंगू शेवाळे, राघू शेवाळे, शशी शेवाळे, सागर शेवाळे, सुकन्या नागरगोजे, सुरेश पवार, गौरी पवार, बादल काळे, चंदा काळे, दादू पवार, रोशन जाधव, निलेश जाधव, दुर्गा गुडे, मीरा गुडे, लखन गुडे, संतोष शिंदे, सोनाली शिंदे, प्रदीप शिंदे, सत्यभामा शिंदे, कृष्णा शिंदे, विठ्ठल काळे, मंजुळा काळे, चंदू काळे, लक्ष्मण काळे, अनुसया काळे, रशिदा खान, मुशिर खान, सायरा खान, बाबू शेवाळे, मल्लाक्का शेवाळे, लक्ष्मण शेवाळे, विमल शेवाळे, काजल पवार.

Check Also

सराईत सोनसाखळी चोरांना अटक

जवळपास पावणेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर खारघर, उलवेसह नवी मुंबई परिसरात …

Leave a Reply