मुरुड : प्रतिनिधी
नगर परिषदेचे सुमारे 46 सफाई कर्मचारी दररोज मुरुड शहरात साफसफाईचे काम करतात. स्टार फाउंडेशनच्या वतीने या कर्मचार्यांना दिवाळीनिमित्त शनिवारी (दि. 14) मिठाईचे बॉक्स आणि स्टीलच्या ताटांचे वाटप करण्यात आले.
स्टार फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष जाहिद फकजी, जिल्हा अध्यक्ष अंकीत गुरव, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष संजय करडे, फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष इम्यिताज गोलदाज, शहर अध्यक्ष हर्षद साठे, सदस्य गणेश फिरके यांच्यासह सफाई कामगार उपस्थित होते.