मुंबई : मागील अनेक दिवसांपासून राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी प्रमुख विरोधी पक्ष भाजपकडून सातत्याने केली जात होती. प्रार्थनास्थळे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने अनेकदा घंटानाद आंदोलनेही केली होती, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे कारण देत धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी नाकारण्यात येत होती. अखेर दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच सोमवार (दि. 16)पासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. धार्मिकस्थळी दर्शन घेताना कोरोनाविषयक नियम, शिस्तीचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे. प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळून स्वतःबरोबर इतरांचेही रक्षण करावे, असे आवाहन या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …