Breaking News

ती’ फिक्सिंग नव्हे : बीसीसीआय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

दिल्लीच्या फिरोजशहा मैदानावर दिल्ली विरुद्ध कोलकाता सामन्यात सुपरओव्हरमध्ये दिल्लीने बाजी मारली. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला हा सामना फिक्स होता का, अशी शंका सध्या सोशल मीडियावर नेटीझन्सकडून व्यक्त केली जात आहे. दल्लीच्या गोलंदाजीदरम्यान यष्टीरक्षक ऋषभ पंतने व्यक्त केलेला अंदाज तंतोतंत खरा ठरल्यामुळे आयपीएलवर फिक्सिंगचे सावट असल्याची चर्चाही नेटीझन्समध्ये रंगत आहे. या सर्व प्रकारावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) स्पष्टीकरण देत फिक्सिंगची शक्यता फेटाळून लावली आहे.

कोलकात्याची फलंदाजी सुरू असताना दिल्लीचा संदीप लामिच्छाने चौथे षटक टाकत होता. या वेळी ऋषभ पंतने यष्टींमागून क्षेत्ररक्षणात बदल करत असताना, ये तो वैसे भी चौका है (यापुढचा चेंडू तर चौकारच जातोय) असे वक्तव्य केले. स्टम्पजवळ लावलेल्या माईकमध्ये पंतचे हे वक्तव्य रेकॉर्ड झाले, मात्र त्या वाक्याआधी पंत नेमके काय बोललाय हे कोणीही ऐकले नाहीये. कदाचित तो कर्णधार श्रेयस अय्यरला ऑफ साईडला चौकार थांबवण्यासाठी क्षेत्ररक्षक वाढवण्यासाठीही सांगत असेल. बीसीसीआयच्या एका अधिकार्‍याने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना हे स्पष्टीकरण दिले आहे.

याचसोबत ऋषभ पंतने ते वाक्य नेमक्या कोणत्या अनुषंगाने म्हटले हेही व्हिडीओमधून स्पष्ट होत नाहीये. काय घडलेय हे जाणून न घेता एखाद्या तरुण खेळाडूची कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे. एखाद्या व्हिडीओची सत्यता न पडताळता काही प्रसारमाध्यमांनी याला फिक्सिंगच स्वरूप देऊन बातम्या केल्या आहेत. हा प्रकार योग्य नसल्याचेही बीसीसीआयच्या अधिकार्‍याने स्पष्ट केलं.

Check Also

केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवा -मंत्री आदिती तटकरे

माणगाव : प्रतिनिधी महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धन विधानसभा …

Leave a Reply