Breaking News

रोह्याच्या राकेश कागडांनी पूर्ण केली सातारा मॅरेथॉन

रोहे : प्रतिनिधी

रोहे शहरातील सामाजिक कार्यकर्ते राकेश कागडा यांनी रविवारी (दि. 25) झालेल्या सातारा मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत 21 किलोमीटरचे अंतर दोन तास 36 मिनिटांत पूर्ण केले.

सातारा मॅरेथॉन ही खडतर मानली जाते. या स्पर्धेत धावण्यासाठी केनिया, आफ्रिकासारख्या देशातून अनेक ख्यातनाम धावपटू सहभागी होत असतात. या स्पर्धकांमध्ये स्वतःचे स्थान टिकवून ही स्पर्धा पूर्ण करणे मोठे आव्हान असते. रोह्याच्या धावपटूने हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले. याबद्दल राकेश कागडा यांचे विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Check Also

रोजगार महाकुंभला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय …

Leave a Reply