पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विकासाची अनेक कामे सातत्याने सुरू असतात. अशाच प्रकारे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ओएनजीसी ते शिवकर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम मंजूर करण्यात आले असून, हे काम सुरू झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कामाची बुधवारी (दि. 18) पाहणी करून अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
या पाहणी वेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, मच्छिंद्र पाटील, जयवंत भगत, विजय भगत, मारुती पाटील, जगदीश ढवळे, अरविंद माळी, अंबाजी ढवळे, गणेश भगत, प्रमोद भगत, बाबू भगत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिकार्यांना या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …