Breaking News

पुलवामा हल्ल्याचा पनवेल परिसरात निषेध

पनवेल : वार्ताहर

पुलवामा येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात जवानांना नाहक जीव गमवावा लागला. याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. 16) पनवेल परिसरातील व्यापारी बंधूंनी निषेधात्मक फेरी काढून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत या घटनेचा निषेध केला व जवानांना श्रद्धांजली वाहिली. काही ठिकाणी सकाळच्या वेळी बंदसुद्धा पाळण्यात आला.

पनवेल शहरात ज्वेलर्स असोसिएशनसह अनेक व्यापार्‍यांनी सकाळी निषेध फेरी काढली. या फेरीत ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल जैन, नगरसेवक राजू सोनी, संजय जैन, रमेश जैन, गौरव बांठिया, गिरीष बांठिया आदींसह शेकडो व्यापारी सहभागी झाले होते. अशाच प्रकारे नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे, कळंबोली, खारघर आदी भागांत व्यापारी व विविध सामाजिक संघटनांनी निषेध फेरी काढली होती. यानिमित्ताने शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली

वाहण्यात आली.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply