पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण-कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावीचा शुभचिंतन व निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य व स्कूल कमिटी चेअरमन अरुणशेठ भगत यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सर्व मुलांनी पास व्हावे, तसेच आठवणीत राहावा असा शंभर टक्के निकाल लावावा. परीक्षेस हिंमत धरून सामोरे जा. खूप मोठी संधी आपल्याला आहे, त्या संधीचे सोने करा व खूप मोठे व्हा आणि या शाळेला विसरू नका, असा कळकळीचा सल्लाही त्यांनी दिला. प्रमुख वक्ते न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पवार यांनी शाळेचे संस्कार खूप मोठी ओळख निर्माण करून देतात, तसेच इंग्रजी विषयावर प्रभ्ाुत्व असावे. रायगड विभागातील मुलांनी प्रशासन सेवेत येण्याकरिता प्रयत्न करावेत, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एस. रंधवे यांनी केले.
कार्यक्रमास गव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता अजय भगत, स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी, अॅड. रूपेश म्हात्रे, विजय घरत, भाऊ भोईर, माई भोईर, योगिता घरत, अजय भगत, विद्यालयाचे प्राचार्य यू. एल. गायकवाड, उपप्राचार्य शेख, लेखनिक मढवी, ग्रंथपाल महेश म्हात्रे, एस. आर. कदम, यू. डी. पाटील, सौ. ठाकूर, ए. आर. पाटील व विद्यालयातील सर्व रयत सेवक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार आर. ए. खेडकर यांनी मानले.
उरण : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात महालण विभागाचे शिक्षणमहर्षि वीर वाजेकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दहावी शुभचिंतन, पारितोषिक वितरण सोहळा आणि शाळेस भेट दिलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार
सोहळा झाला.
या कार्यक्रमास विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन कृष्णाजी कडू, प्राचार्य एम. एच. पाटील, पर्यवेक्षक आर. पी. ठाकूर आणि सर्व स्कूल कमिटी सदस्य उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगतात चेअरमन कृष्णाजी कडू यांनी विद्यार्थ्यांना वीर वाजेकरांच्या कार्याची माहिती सांगितली. विद्यालयाचे प्राचार्य एम. एच. पाटील यांनी प्रास्ताविक केले. इयत्ता दहावीची विद्यार्थिनी सोनल गुट्टे हिने आपल्या भाषणातून शाळा व शिक्षक यांच्याविषयी आदर व्यक्त केला. स्कूल कमिटी सदस्य योगेश पाटील आणि लक्ष्मण पाटील यांनीही दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या.
यानंतर संपूर्ण वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा आणि उपक्रमात प्राविण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परितोषिक देऊन गौरविण्यात आले, तसेच वर्षभरात शाळेस भेटवस्तू दिलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे निवेदन सांस्कृतिक विभागप्रमुख दर्शना माळी यांनी केले. सोहळा यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.