Breaking News

घरोघरी तुळशीच्या रोपाचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

आपला सण-उत्सव-संस्कृती ही सर्व प्रथम आपण जपली पाहिजे. हल्लीच्या काळात पूर्वी घरो-घरी होणारे तुलसी विवाहाच प्रमाण हळूहळू घटत जात आहे. या गोष्टीची दखल घेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणलीच्या माध्यमातून गेली तीन वर्षे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी पवित्र तुळशीचे रोप कुंडीसहित भेट देत आहेत. याही वर्षी हा उपक्रम राबविण्यात आला. आपली संस्कृती टिकून राहावी व घरोघरी तुलसी विवाहच्या माध्यमातून पवित्र तुलसी मातेचे दैनंदिन पूजन व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे आयोजक भाजप कळंबोली शहर जनसेवक नितीन काळे हे असून या उपक्रमासाठी पनवेल स्थायी समिती सभापती अमर  पाटील, भाजप कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, नगरसेवक बबन मुकादम, नगरसेविका राणी कोठारी, प्रभाग अध्यक्ष प्रकाश शेलार यांचे सहकार्य लाभत आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply