Wednesday , February 8 2023
Breaking News

जाधव कुटुंबीयांना वीज मंडळाकडून मदत

मोहोपाडा : प्रतिनिधी

मोहोपाडा आळी आंबिवली येथील भालचंद्र हरिभाऊ जाधव (वय 40) याचा वीज पोलवरून पडून मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना वीजमंडळाकडून पाच लाख रोख रक्कम आर्थिक मदत म्हणून गुरुवारी (दि. 23) सायंकाळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत देण्यात आली.

वीजमंडळाचे कंत्राटी कामगार भालचंद्र जाधव हे मोहोपाडा बाजारपेठ रस्त्यावरील गणेश गीध यांच्या दुकानासमोरील वीज पोलवरील बंद अवस्थेतील पथदिवा बदलून त्या जागी नवीन पथदिवा लावण्यास पोलवर चढले असताना अचानक विजेचा धक्का लागून खाली पडले. या वेळी डोक्याला गंभीर दुखापत होऊन भालचंद्र यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मोहोपाडा वीजमंडळाचे उपअभियंता किशोर पाटील, माजी सरपंच संदीप मुंढे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे, तसेच स्थानिक नागरिक यांनी भालचंद्र हरिभाऊ जाधव यांच्या घरी जाऊन त्यांची पत्नी भाविका जाधव व कुटुंबीय यांना रोख रक्कम पाच लाख आर्थिक मदत म्हणून सुपूर्द केली. याव्यतिरिक्त भालचंद्र यांच्या कुटुंबीयांना वीजमंडळ 15 दिवसांनंतर एक लाख देणार आहेत, तसेच भालचंद्रच्या मृत्यूमुळे विम्याची रक्कम, वासांबे ग्रामपंचायतीकडून कुटुंबीयांना आर्थिक सहकार्य मिळणार असल्याचेही वृत्त आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply