Breaking News

विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा

विधान परिषदेसाठी प्रदेशाध्यक्ष पटोले आग्रही

मुंबई ः प्रतिनिधी

विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळे विधान परिषदेत आमचा विरोधी पक्षनेता असावा, अशी मागणी काँगे्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पटोलेंच्या मागणीमुळे आता महाविकास आघाडीत याबाबत काय निर्णय होतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर विधान परिषदेत आमचा विरोधी पक्षनेता असावा, अशी आमची मागणी असून आम्ही ती राष्ट्रवादीकडे करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींचा अहवाल पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने मागितल्यानंतर विधान परिषदेतील क्रॉस वोटिंगसंदर्भातील माहितीचा अहवाल हायकमांडला पाठवणार असल्याचेही काँगे्रस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.

Check Also

रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष

रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply