पनवेल ः रामप्रहर वृत्त – रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून, शनिवारी (दि. 28) नवे 121 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 85 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 91 व ग्रामीण 12) तालुक्यातील 103, अलिबाग सात, खालापूर व कर्जत प्रत्येकी तीन, पेण व मुरूड प्रत्येकी दोन तर महाड तालुक्यात एकाचा समावेश आहे. शनिवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 56,980 आणि मृतांची संख्या 1603 झाली आहे. आतापर्यंत 54,207 जण कोरोनामुक्त झाल्याने 1170 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
RamPrahar – The Panvel Daily Paper