खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली हद्दीत शुक्रवारी (दि. 25) सकाळी सिमेंट भरलेला आयशर टेम्पो सुरक्षा कठडा तोडून दरीत कोसळला. या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला.
सिमेंट गोण्या भरलेला टेम्पो (एमएच-46,डिएम-7806) शुक्रवारी सकाळी बोरघाटातून मुंबईच्या दिशेने जात होता. खोपोलीजवळ ढेकू गावच्या हद्दीत आयशर टेम्पोने (एमएच-02,एफजी-1183) या सिमेंटच्या टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे सिमेंट गोणी भरलेला टेम्पो सुरक्षा कठडा तोडून खोल दरीत कोसळला. य अपघातात टेम्पोचा चालक उत्तम कैलास दास (वय 34, रा. पश्चीम बंगाल) जागीच मृत्यू पावला. खोपोली पोलीस पुढील तपास करीत आहेत.