Breaking News

चला धावूया आरोग्य जागरूकतेसाठी!; कामोठ्यात शुक्रवारी फन रन, लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कामोठ्यातील छाबा फाऊंडेशनच्या वतीने 14 नोव्हेंबर रोजी 5 आणि 10 किलोमीटर पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम समाज निर्माण करणे आणि वंचित मुलांच्या प्रगतीसाठी त्यांना पोषक अन्न आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाने या रनचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशभर लॉकडाऊन अर्थात टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. या कालावधीत सर्वांनाच घरात अडकून राहावे लागले. या दरम्यान चांगल्या आरोग्याचे आणि निरोगी शरीराचे महत्त्व सर्वांना कळले. या पार्श्वभूमीवर कामोठ्यात फन रन होत आहे. कामोठे सेक्टर 6 मधील रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानात येत्या 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.30 वाजता या स्पर्धेची सुरुवात होणार असून याच ठिकाणी सकाळी 8.30 वाजता बक्षीस वितरण समारंभ होई. या वेळी सुमारे 50 एचआयव्ही पॉझिटिव्ह बालकांना भेटवस्तू देऊन प्रोत्साहित करण्यात येणार आहे. स्पर्धा 18 ते 30, 30 ते 45, 45 ते 60 आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील पुरुष व महिलांसाठी आहे. सहभागासाठी इच्छुकांनी https://www.townscript.com/e/kamothe-10km-5km-run-for-health-awareness-202423या लिंकद्वारे स्वतःची नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी शेखर जगताप (9167048454), सचिन तांबोळी (7506750311), राहुल जैस्वाल (9172415144), दामोदर चव्हाण (9619452447) यांच्याशी संपर्क करावा. सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट, नाश्ता, टाइमिंग चिप, पदक, ई-प्रमाणपत्र आणि विजेत्यांसाठी ट्रॉफी असेल. या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजप कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, नगरसेवक विकास घरत, विजय चिपळेकर, दिलीप पाटील, डॉ. अरुणकुमार भगत, युवा नेते हॅप्पी सिंग यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply