Breaking News

बारणेंच्या विजयाचा महायुतीचा निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त

मावळ मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचे जोरदार वारे पनवेल मतदारसंघात वाहत आहेत. महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येक मतदारापर्यंत्त पोहचून श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. त्याअंतर्गत तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पोयंजे, बारवई, भोर्ले गावात आणि रसायनी विभागात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी भाजपचे तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, गुळसुंदे विभागीय अध्यक्ष प्रविण खंडागळे, माजी सरपंच योगेश लहाने, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, पोयंजेचे सरपंच रमेश मते यांच्यासह शिवसेना-भाजप महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply