मुंबई : प्रतिनिधी
मुंबईच्या लालबाग परिसरातील एका इमारतीत रविवारी (दि. 6) सकाळी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन 20 जण होरपळले आहेत. जखमींना केईएम व ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या घरात स्फोट झाला त्या घरामध्ये लग्नकार्य असल्याने पाहुणे मंडळी उपस्थित होती.
लालबाग येथील साराभाई इमारतीत वास्तव्याला असणार्या राणे कुटुंबीयांच्या घरात ही दुर्घटना घडली. राणे यांच्या मुलीचे लग्न असून, रविवारी हळदीचा कार्यक्रम होता. अशातच सकाळी स्वयंपाक करीत असताना अचानक गॅस गळती सुरू झाली आणि सिलिंडरचा स्फोट झाला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. जखमी झालेल्या 20 जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यामध्ये नवरीच्या वडिलांचाही समावेश आहे.
Check Also
करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …