नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना रविवारी (दि. 6) अभिवादन केले. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांना जो भारत अपेक्षित होता तो निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून म्हटले आहे.
लक्षावधी नागरिकांच्या आयुष्यात जो प्रगतीचा नंदादीप तेवला आहे त्यामागे बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा आहे. त्याचे सर्वांनी अनुकरण करावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले आहे.
Check Also
पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …