पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील काही भागात बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत असून, शहरी वस्तीपासून दूर जंगलभागात दिसणारा बिबट्या आता भर लोकवस्तीत दिसू लागला आहे. पालीजवळ असलेल्या झाप फाटा परिसरात रविवारी (दि. 6) सायंकाळी एका व्यक्तीला बिबट्या दिसून आला. त्यामुळे लोक भयभीत झाले आहेत. मागील महिन्यात पालीतील वाघजाई नगर येथे एका गुरख्यास बिबट्या दिसला होता. त्यानंतर आता झाप गावाजवळ दर्शन झाल्याने बिबट्याच्या वावर असल्याबाबत पुष्टी मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सुधागड-पाली वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी नागरिकांना सतर्क राहून काळजी घेण्याचे तसेच वनविभागास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.