पनवेल : मावळ लोकसभा मतदासंघातून युतीचे श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय झाला. त्यानिमित्त भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा रायगड जिल्हा प्रभारी सय्यद अकबर यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी युवा नेते इरफान तांबाळी, चमाल शहा, दर्गा ट्रस्टचे विश्वस्त जावेद बाबा, लोककल्याणकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष नासीर खान, सचिव सलमा खान, सामाजिक कार्यकर्त्या शरिफा मुल्ला, अल्पसंख्याक नवीन पनवेल उपाध्यक्ष नासिर खान, मुदतसर गोलंदाज, अमजत खान, सिजान मुजावर, सागर शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …