Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या निधीतून होणार विविध विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात येणार्‍या विविध विकासकामांचे भूमिपूजन 9 आणि 10 डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह पदाधिकारी तसेच स्थानिक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. बुधवारी (दि. 9) कोळखे पारपुंड गाव ते पळस्पे फाटा नदीला संरक्षण भिंत बांधणे, डेरवली येथे मूर्ती विसर्जन घाट बांधणे, खानावळे येथे अंतर्गत रस्ता तयार करणे, तुरमाळे येथे सुदाम भोपी यांच्या घरापासून ते जनार्दन जाधव यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे; तर गुरुवारी (दि. 10) आपटा पिंपळआळी येथे अंतर्गत रस्ता तयार करणे, चावणे जलशुद्धीकरण केंद्र ते लाडिवली पाण्याच्या टाकीपर्यंत पाइपलाइन टाकणे आणि जाताडे येथे अंतर्गत रस्ता तयार करणे या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

Check Also

पनवेलमध्ये शुक्रवारपासून राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी

राज्यातून निवडलेल्या 25 उत्कृष्ट एकांकिका होणार सादर पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास …

Leave a Reply