चिपळूण : प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि. 10) रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात अलोरे येथील कोयना प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याची पाहणी केली. मुख्यमंत्री ठाकरे कोयनेतून भुयारीमार्गे चौथ्या टप्प्यात आले आणि पाहणी करून पुन्हा माघारी परतले. त्यामुळे पोफळी व आलोरेवासीयांसाठी त्यांचा दौरा केवळ उत्सुकतेचा विषय ठरला. मुख्यमंत्री अलोरेत आले कधी गेले कधी हे स्थानिकांना समजलेच नाही.
मुख्यमंत्री ठाकरे आलोरेला येणार म्हणून गेली दोन दिवस शासकीय यंत्रणा कामाला लागली होती. कोयना प्रकल्प ही राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळे येथे परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. मुख्यमंत्र्यांसोबत राहणार्या वरिष्ठ अधिकार्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. अहवाल निगेटिव्ह आलेल्या अधिकार्यांनाच त्यांच्या दौर्यात प्रवेश देण्यात आला होता, तर कोयना प्रकल्पात काम करणार्या कर्मचार्यांसाठी पोलिसांकडून विशेष पासची व्यवस्था करण्यात आली होती.
शिवसेनेचे काही स्थानिक पदाधिकारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या स्वागतासाठी थांबले होते, मात्र मुख्यमंत्री वीजनिर्मिती प्रकल्पातून बाहेर आलेच नाही. सकाळी 11 वाजता हेलिकॉप्टर आले तेव्हा मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्याचे कळले. दुपारी 1च्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा पुण्याच्या दिशेने रवाना झाले, तेव्हा मुख्यमंत्री गेल्याचे लोकांना समजले.
Check Also
पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …