Breaking News

पनवेल तालुक्यात अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रस्त्यांचे भूमिपूजन आणि उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा विकास निधी, तसेच मूलभूत सुविधा विकास योजनेंतर्गत (25/15) पनवेल तालुक्यातील विविध रस्ते कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन मंगळवारी (दि. 7) भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अरुणशेठ भगत यांनी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होत असून गावाचा विकास करण्यासाठी भाजपशिवाय पर्याय उरलेला नाही, असे प्रतिपादन केले.
पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे विकासाची अनेक कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत आमदार विकास निधीतून आठ लाख रुपये खर्चाच्या शिवणसई थांबा ते दुर्गामाता मंदिर आणि 10 लाख रुपये खर्चाच्या चिंचवली ते भानघर या रस्त्यांचे, तर मूलभूत सुविधा विकास योजनेंतर्गत (25/15) वाकडी ते दुंदरे या 20 लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. त्याचप्रमाणे मोर्बे येथील एकनाथ नावडेकर यांचे घर ते मराठी शाळेपर्यंत आमदार निधीतून 16 लाख रुपये खर्च करून रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटनही अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
ठिकठिकाणी झालेल्या या कार्यक्रमांना भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, सरपंच अनुराधा विष्णू वाघमारे, उपसरपंच मंगला गणेश उसाटकर, ग्रामपंचायत सदस्य रमेश नावडेकर, एकनाथ नाईक, माजी सरपंच नरेश पाटील, तसेच प्रकाश खैरे, नामदेव जमदाडे, शिवाजी दुर्गे, रमेश पाटील, मयूर कदम, दिनेश फडके, बाळाराम उसाटकर, रामदास फडके, रामदास म्हात्रे, रवींद्र पाटील, नारायण भगत, जयवंत खोपकर, जनार्दन भगत, हरिश्चंद्र नावडेकर, प्रमोद भगत, शांताराम चौधरी, किशोर पाटील, नारायण चौधरी, शत्रुघ्न उसाटकर, उमेश वारदे, गणेश म्हात्रे, भगवान म्हात्रे, धनाजी शिंदे, पिंटू म्हात्रे, विठ्ठल पाटील, भीमा गोसावी, बाळाराम पालांडे, शंकर पवार, विष्णू चौधरी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. या विकासकामांबद्दल ग्रामस्थांनी आमदार प्रशांत ठाकूर व भाजपला धन्यवाद दिले आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply