Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 70वा वाढदिवस होणार भव्य अन् संस्मरणीय; विविध समाजोपयोगी कार्यक्रमांची असणार रेलचेल

पनवेल : हरेश साठे

गोरगरीब असो वा श्रीमंत सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे आणि सगळा समाज आपला कुटुंब आहे असे मानून नेहमी मदतीचा हात देणारे दानशूर व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा यंदा 70वा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला जातो. यंदाही सामाजिक विकासाच्या दृष्टिकोनातून पण त्यांच्या कार्याला साजेसा असा भव्य स्वरूपात आणि संस्मरणीय वाढदिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यासंदर्भात खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या विशेष उपस्थितीत व भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची पहिली बैठक शनिवारी (दि. 16) झाली. माणूस केवळ दौलतीने मोठा होत नाही, तर तो दानत आणि माणुसकीने मोठा होतो. याचे जिवंत उदाहरण म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते. महापूर, कोरोना वैश्विक महामारी किंवा अन्य कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असो लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेहमीच मदतीचा हात पुढे करून कायम सामाजिक बांधिलकी जपली आणि माणुसकीचे दर्शन घडविले आहे. त्यांची प्रेरणा घेऊन अनेकांनी समाजसेवा अंगीकारली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दानशूरतेची व सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, कला, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांतील कार्याची महती राज्यातच नव्हे, तर देशभर पसरली आहे. त्यांचा यंदा असलेला 70वा वाढदिवस विशेष आहे. त्यामुळे कार्यकर्ते व लोकाग्रहास्तव हा वाढदिवस भव्य स्वरूपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा उत्तुंग वाढदिवस साजरा व्हावा यासाठी यंदा किमान सात दिवस तरी मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम घेण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. या वेळी नियोजनासंदर्भात झालेल्या चर्चेत भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, नगरसेवक नितीन पाटील, हरेश केणी, बबन मुकादम, डॉ. एस. टी. गडदे, ब्रिजेश पटेल, मयुरेश नेतकर आदींनी विविध कार्यक्रमांच्या आयोजनाबद्दल सूचना मांडल्या. त्या अनुषंगाने या सूचनांची नोंद करून येत्या 15 दिवसांत कार्यक्रमांची अंतिम रूपरेषा ठरविण्यात येणार आहे. व्यासपीठावर स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक अनिल भगत, अमर पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत बर्‍हाटे, वसंत पाटील उपस्थित होते. त्याचप्रमाणे बैठकीला आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वाढदिवस निमित्त आहे. जनतेची सेवा करणे महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे माझ्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात, त्याप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे झाले पाहिजेत. सर्वांचे वाढदिवस मोठ्या स्वरूपात होऊ शकत नाहीत. प्रत्येकाचा वाढदिवस भव्य नसला तरी थोड्याबहुत प्रमाणात सामाजिक उपक्रमाची जोड असावी.

लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, क्रीडा, राजकीय अशा विविध क्षेत्रांतील काम प्रेरणादायी आहे. सर्वांचे प्रेरणास्रोत असलेले असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्त होणारे समाजोपयोगी उपक्रम भव्य व दर्जेदार व्हावेत यासाठी सर्वांचे सहकार्य मोलाचे आहे.

-आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष, उत्तर रायगड जिल्हा भाजप

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सर्वांत जास्त सहवास लाभला. त्यांचे कार्य उत्तुंग आहे. अनेक पुरस्कार, मान-सन्मान त्यांना मिळाले आहेत. लोकांना ते सढळ हस्ते मदत करतात. कोरोना काळातही त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा आणि आधार दिला. त्यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. मल्हार महोत्सव, मॅरेथॉन, आरोग्य महाशिबिर अशा विविध कार्यक्रमांच्या दर्जेदार व भव्य आयोजनाची आपल्याला सवय आहे. त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त होणारे उपक्रम भव्य आणि यशस्वी करू या.

-वाय. टी. देशमुख, ज्येष्ठ भाजप नेते

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply