Breaking News

पनवेल येथील दीक्षा सोनार यांच्या लघुपटाला नामांकन

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारत सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग व मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली आयोजित इंडिया इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिवल, (शॉर्ट फिल्म) दिल्लीचे नामांकन नुकतेच जाहीर झाले आहे. विद्यार्थी गटात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक मंडळ संचालित नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर विद्यालयाची इयत्ता 12वी सायन्सची विद्यार्थिनी दीक्षा मनोज सोनार दिग्दर्शित व अभिनित, पर्यावरण आधारित   सीएफसी (क्लोरोफ्लोरोकार्बन) एक शाप या लघुपटाला  नामांकन मिळाले आहे.

या साठी पटकथा लेखन ओम सुर्वे, अभिनय दीक्षा व डिम्पल सोनार आणि सोहंम वानखेडे या बालकलाकारांनी केला आहे. छायांकन व संकलन अजय खामकर यांनी केले आहे. या यशाबद्दल शालेय व विभागीय स्तरावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

भारतातील सर्वात मोठा इंडिया इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिवल, (खखडऋ) दिल्लीत असून, संकल्पना आत्मनिर्भर भारत आहे. 2015पासून या कार्यक्रमाचे आयोजन होत असून पहिला, व दुसरा दिल्ली येथे, तिसरा चेन्नई, चौथा लखनौ, पाचवा कलकत्ता येथे आयोजन करण्यात आले होते. फेस्टिवलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 22) होणार असून संपूर्ण कार्यक्रम व्हर्च्युअल ऑनलाइन होणार आहे. यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विभागातून मोठा सहभाग राहणार आह. अधिक माहितीसाठी IISF website www.scienceindiafest.org. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply