Breaking News

जपान ओपन : साईप्रणीतचे आव्हान अखेर संपुष्टात

टोकियो : वृत्तसंस्था

भारताच्या बी. साईप्रणीतला जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. याबरोबरच भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत अग्रमानांकित जपानच्या केंतो मोमोताने बी. साईप्रणीतचे आव्हान 21-18, 21-12 असे परतवून लावले. ही लढत 45 मिनिटे चालली. जागतिक क्रमवारीत केंतो अग्रस्थानी असून, साईप्रणीत 23व्या स्थानावर आहे. यापूर्वी दोघे चार वेळा आमनेसामने आले होते. त्यात दोघांनी प्रत्येकी दोन लढती जिंकल्या होत्या. या स्पर्धेत बी. साईप्रणीतने पहिल्या गेममध्ये केंतोला चांगली लढत दिली, मात्र दुसर्‍या गेममध्ये त्याला आव्हान राखण्यात यश आले नाही. केंतोची आता जेतेपदासाठी जोनाथन ख्रिस्टीविरुद्ध लढत होईल. सहाव्या मानांकित जोनाथनने जॅन ओ जॉर्जेनसेनवर 21-14, 21-14 असा विजय मिळवला. महिला एकेरीत नोझोमी ओकुहाराने मिचेल लीवर 21-12, 21-18 असा, तर अकेन यामागुचीने चेन यू फेईवर विजय मिळवला.

Check Also

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य मूट कोर्टचे बुधवारी उद्घाटन

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक …

Leave a Reply