Breaking News

विद्युत वाहिनी पुर्ववत

नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा

पनवेल : वार्ताहर – पनवेल प्रभाग 18 मधील विद्युत वाहिनी तुटल्याची माहिती मिळताच भाजप नगरसेवक विक्रांत पाटील यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांशी बोलून त्वरित काम करून घेतले. विद्युत वाहिनी पुर्ववत झाल्याने नागरिकांनी विक्रांत पाटील यांचे आभार मानले आहेत.

नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच कर्तव्यदक्षपणे जनसेवेसाठी व प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात. नागरिकांच्या समस्येचे निरसन लवकरात लवकर व्हावे यासाठी नेहमीच त्यांची प्राधान्यता असते. त्यांच्या या तत्परतेच्या कामाची पावती प्रभागातील नागरिक समाधान व्यक्त करून देत असतात.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply