Breaking News

पनवेलमधून उत्तम कलाकार निर्माण होतील

भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे प्रतिपादन

पनवेल ः प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक सेल पनवेल शहरतर्फे आयोजित मनोरंजन अनलॉक पनवेल संगीत, नृत्य व नाटकाची मेजवानी कार्यक्रम शनिवारी (दि. 26) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
पनवेल शहर एका बाजूला असल्याने मोठमोठ्या नाट्यसंस्था येथे येत नसल्याबद्दल खंत व्यक्त न करता याकडे संधी म्हणून पाहावे. स्थानिक कलाकारांना संधी उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे पनवेलमधून
दर्जेदार कलाकार निर्माण होतील, असे प्रतिपादन या वेळी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले. भारतीय जनता पक्ष पनवेल शहर सांस्कृतिक सेलच्या वतीने आयोजित मनोरंजन अनलॉक कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप सांस्कृतिक सेलचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक शैलेश गोजमगुंडे, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, नगरसेवक संतोष भोईर, दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, रूचिता लोंढे, शहराध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस अमरिश मोकल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी चिन्मय समेळ, भाजप प्रदेश सांस्कृतिक सेल सदस्य राहुल वैद्य, सुनील सिन्हा आदी उपस्थित होते.
मानवाच्या तीन मूलभूत गरजांबरोबरच ’व्यक्त होणे’ ही चौथी गरज असून कलेच्या माध्यमातून ती पूर्ण होते. आपल्या संस्कृतीमध्ये कलेला राजाश्रय आणि लोकाश्रयही लाभला. त्यामुळे आजपर्यंत आपली कलासंस्कृती टिकून असल्याचे मत उपाध्ये यांनी या वेळी व्यक्त केले. लॉकडाऊन संपल्यानंतर गायन, नाटक आदी सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोनाच्या कठीण काळानंतर प्रथमच फडके नाट्यगृहात नाटक व संगीताच्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती. त्याचे श्रेय सांस्कृतिक सेलचे शहराध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांना देताना महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपले रोजचे टीव्हीवरील शो पाहून अनलॉक होताना हाच चांगला कार्यक्रम आहे असे वाटून आज मला या कार्यक्रमाला बोलावले असावे, असे सांगितले. शहरातील कलाकार येथे येत नसतील, तर हीच चांगली संधी आहे असे समजून काम करा. येथील कलाकारांतून मोठे कलाकार घडतील, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
या वेळी भाजप सांस्कृतिक सेल महाराष्ट्र प्रदेश संयोजक शैलेश गोजमगुंडे यांनी कलेला राजाश्रय असला की ती फुलते, खुलते. पनवेलमध्ये कलेला राजाश्रय देण्याचे काम महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी यशस्वीपणे केल्याचे सांगून देशाची संस्कृती संपन्न करण्यासाठी भाजप सांस्कृतिक सेल कार्यरत आहे. मळभ आलेल्या व्यक्तीला प्रफुल्लित करण्यासाठी कला आणि कलास्वाद हाच अंतिम पर्याय असतो, असे स्पष्ट केले. या वेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील यांनी ज्या देशाची संस्कृती मोठी तो देश महान असतो, असे सांगून भाजप सांस्कृतिक सेल आपली परंपरा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे नेण्याचे महत्त्वाचे कार्य करीत असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाची संपूर्ण संकल्पना तसेच नियोजन महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक सेलचे शहराध्यक्ष अभिषेक पटवर्धन, सहसंयोजक गणेश जगताप तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोरोनासंदर्भातील खबरदारी बाळगून करून कार्यक्रम यशस्वी केला.
यानिमित्त प्रसिद्ध संगीतकार व गायक अनिरुद्ध भिडे यांच्या ’सामगंध’ आणि गणेश भगत यांच्या पंचमनिर्मित ’गंध सुरांचा’ यांच्या संयुक्त विद्यमाने गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. अनिरुद्ध भिडे यांनी गीतरामायणातील निवडक गाणी सादर करून रसिकांची प्रशंसा प्राप्त केली. प्रणय पवार, संकेत गोविलकर, मयुरेश हिरे, भूपेंद्र पाटणकर, सिद्धेश शिंदे, श्रेयस केळकर, श्रावणी भिडे, स्वरदा भट, अपूर्वा भट, जुई महाजन, मानसी जगताप आदी कलाकारांनी नांदी, नाट्यगीत, भावगीत व भक्तिगीत गायन केले. देवेंद्र मराठे यांनी संवादिनी, गणेश घाणेकर, आदित्य उपाध्ये यांनी ढोलकी, तबला, प्रवीण भोपी यांनी ऑक्टोपॅड, तर राजू भोईर यांनी की बोर्ड साथ केली. अश्विनी भिडे यांनी अभ्यासपूर्ण निवेदन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यानंतर सीकेटी महाविद्यालयाचे विद्यार्थी व कलादर्पण यांच्या वतीने ‘बायकोच्या नवर्‍याच्या बायकोचा खून’ ही विनोदी एकांकिका सादर झाली.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply