Breaking News

उरण नगर परिषदेत दिनदर्शिकेचे वाटप

उरण : वार्ताहर

अखिल बुरुड समाज प्रतिष्ठानच्या वतीने दिनदर्शिका 2021च्या वार्षिक दिनदर्शिकेचे उरण नगर परिषद नगरसेवक व कर्मचार्‍यांना  शनिवारी (दि. 26) वाटप करण्यात आले. तसेच नगर परिषदेकडून बुरुड समाजासाठी पाच टक्के निधीतून साहित्य मिळण्यासंदर्भात नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी नगराध्यक्ष म्हात्रे यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन बुरुड समाजाला साहित्यासाठी निधी दिला जाईल, असे आश्वासन दिले. या वेळी उरण नगरपरिषद नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्यासह उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह,  नगरसेविका दमयंती म्हात्रे, नगरसेविका आशा शेलार, जानव्ही पंडीत, नगरसेवक मेराज शेख, माजी नगराध्यक्ष अनंत गायकवाड, अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान नियोजित उपाध्यक्ष मध्यवर्ती कमिटी सदानंद गायकवाड, अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान रायगड अध्यक्ष संदीप नागे, उरण शाखा सेक्रेटरी किशोर यशवंत गायकवाड, कुणाल गायकवाड, अतिष नागे, अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान मध्यवर्ती कमिटी उपाध्यक्ष आबा पवार, वसंत गायकवाड, राकेश किल्लेकर, किशोर गायकवाड, कल्पेश खैरे, समिता गायकवाड, रमेश किल्लेकर, प्राची किल्लेकर, वसंत गायकवाड, संजय सोनावणे (रोहा), सागर जामकर (अलिबाग), उमेश गायकवाड, महेंद्र सोनकर, विकेश सोनकर, कल्पेश खैरे, कुणाल गायकवाड, अतिष नागे, प्राची किल्लेकर आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply