एखाद्या गावात किंवा शहरात एखादा मंत्री येतो त्यावेळी त्या गावातील किंवा शहरातील किंवा परिसरातील विकासाचे प्रश्न मार्गी लागतात अशी सर्वसामान्य माणसांची अपेक्षा असते. राज्याचे एक बडे आणि वजनदार मंत्री आदित्य ठाकरे हे माथेरान या जगप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी सरकारी कार्यक्रमासाठी आले होते. त्यांच्या या दौर्याने माथेरानच्या विकासाला आणखी गती येईल अशी अपेक्षा होती, मात्र माथेरानला आदित्य ठाकरे आले आणि तीन तासांनी मुंबईकडे रवाना झाले, याशिवाय वेगळे मत मांडता आदित्य ठाकरे यांच्या या दौर्याचे निमिताने मांडता येणार नाही.
राज्यात तीन पक्षांची महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यात शिवसेनेचे नंबर मधील नेते आदित्य ठाकरे हे माथेरान येथे दौर्यावर आले होते. त्यानिमताने माथेरान मदफाहील अनेक विकास कामे मार्गी लागणार अशी माथेरानकरांना अपेक्षा होती. माथेरान आदित्य ठाकरे माथेरानला आले आणि भूमिपूजन आणि उदघाटन करून निघून गेले. एकाद्या खात्याचा मंत्री शहरात येणार म्हणजे त्या शहरातील अनेक प्रश्न मार्गी लागणार अशी अपेक्षा असते. मात्र ठाकरे यांच्या दौर्याने माथेरान मध्ये एकही नवीन विकासकामांची घोषणा झाली नाही. त्यामुळे त्यांचा हा दौर्या ना गावाच्या विकासाच्या दृष्टीने ना शिवसेनेच्या दृष्टीने फायद्याचा ठरला असे स्पष्ट होत आहे. आगामी काळात माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत असताना आदित्य ठाकरे यांचा दौरा काही कामाचा नव्हता असेच म्हणावे लागेल. पण माथेरान मधील ग्रामस्थांनी आदित्य ठाकरे यांच्या दौर्याने गावाला काही फायदा झाला नाही अशी टीका केली आहे.
माथेरान गिरिस्थान नगरपरिषद मधील विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी राज्याचे पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे माथेरान येथे आले होते. माथेरान पालिकेची निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राज्य सरकारमधील बडे मंत्री असलले आदित्य ठाकरे यांच्या माथेरान दौर्यात राजकीय घोषणा होणार असे अपक्षीत होते. मात्र आदित्य ठाकरे यांच्याकडून माथेरानकरांचा भ्रमनिरास झाला असा आरोप माथेरान मधील विरोधी पक्ष करीत आहे. दरम्यान,माथेरान मध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी मोठा निधी राज्य सरकारने दिला आहे,आम्हाला येथील दवाखाना सुसज्ज व्हावा अशी अपेक्षा होती आणि त्याबाबत घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
राज्य सरकारच्या माध्यमातून माथेरान मध्ये सुरु असलेल्या विकासकामांची उदघाटने आणि भूमिपूजन यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे माथेरान दौर्यावर आले होते. राज्य सरकार मधील बडे मंत्री असलेले आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नेते आहेत त्याशिवाय युवासेनाप्रमुख देखील आहेत.माथेरान पालिकेची सार्वत्रिक निवडणूक यावर्षे अखेरीस होत असताना माथेरान मध्ये राज्यातील बडा मंत्री येत असल्याने पक्षाला;या फायदा होणार अशी अपेक्षा होती आणि त्याचनिमित्ताने आदित्य ठाकरे यांच्याकडून राज्य सरकारचा राजकीय लाभ घेण्यासाठी राजकीय घोषणा केल्या जातील अशी अपेक्षा माथेरानच्या जनतेला होती. माथेरान मध्ये रस्त्यांचे जाळे विकसित करून दुर्लक्षित होत असलेली पर्यटन स्थळे यांचे पर्यावरण पूरक सुशोभीकरण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न निश्चित वाखाणण्याजोगा असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बारीक लक्ष माथेरानवर आहे आणि त्यामुळे राज्याचा पर्यटन तसेच नगरविकास विभाग वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देत आहे.
मात्र माथेरान मधील जनतेला येथील रोजगार निर्माण करणार्या प्राकलापांची घोषणा पर्यटन मंत्री करतील अशी अपेक्षा होती. त्यात बंद असलेली नेरळ- माथेरान – नेरळ मिनीट्रेन सेवा,60 कुटुंबांचा रोजगार अवलंबून असलेल्या व्हॅली क्रॉसिंग,पर्यायी वाहतूक मार्ग मागत असलेल्या माथेरानकरांना आदित्य ठाकरे फिनिक्युलर रेल्वे तसेच रोपवे प्रकल्प आणि ई रिक्षा बाबत जाहीर घोषणा करतील असे वाटले होते. मात्र असे काहीही झाले नाही, त्यामुळे राज्य सरकारमधील सत्तेत सहभागी असलेले परंतु माथेरान मध्ये शिवसेनेच्या विरोधात शड्डू ठोकून बसलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे नगरसेवक शिवाजी शिंदे आणि काँग्रेस कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी माथेरानकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न नगराध्यक्ष यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडले नाहीत आणि आदित्य ठाकरे यांनी देखील कोणतीही मोठी घोषणा केली नाही. राज्यातील बडे मंत्री असलेले आदित्य ठाकरे हे माथेरान साठी भरभरून देतील अशी सर्वांना अपेक्षा होती,मात्र त्यांच्या दौर्यानंतर कोणतेही मोठे प्रकल्प यांची घोषणा न झाल्याने माथेरानच्या जनतेचा भ्रमनिरास झाला अशी नाराजी काँग्रेसकडून व्यक्त झाली.
तर माथेरानच्या प्रथम नागरिक प्रेरणा सावंत यांनी माथेरान मध्ये काळी पट्टी बांधून वावरणार्या लोकांना माथेरान मध्ये सुरु असलेला विकास दिसत नाही असा टोला मारला आहे. माथेरान मधील सर्व प्रमुख रस्ते नव्याने सुसज्ज होत असून पर्यावरण पूरक कामे होत आहेत.सर्व प्रेक्षणीय स्थळे नव्या रूप धारण करून सज्ज झाली असून माथेरानला जी खरी गरज आहे ती म्हणजे सुसज्ज हॉस्पिटल. ते देण्याचे आदित्य ठाकरे मेनी केले असून अल्पवधीत माथेरान मधील बी जी हॉस्पिटल सीएसआर फंडातून सुसज्ज होईल असा आशावाद व्यक्त करून माथेरान मधिल मुख्य बाजारपेठ एकसारखी दुकाने,एकसारखे रंगाची आणि वेगळ्या लूक मध्ये उभी करण्याचा आदित्य ठाकरे यांचा संकल्प आहे. त्यांनी आपल्या दौर्यात निवडणुका लक्षात घेऊन काही घोषणा केल्या नसतील पण माथेरान बदलत आहे आणि ते राज्य सरकारने दाखवलेल्या विश्वासामुळे हे माथेरानची जनता जाणून आहे. त्यामुळे त्यांनी एवढे दिले असल्याने आणि ते देतच आहेतम्हणून आम्हाला आणखी काही मागायची गरज वाटली नाही अशी प्रतिक्रिया प्रेरणा सावंत यांनी व्यक्त केली आहे.
-संतोष पेरणे, खबरबात