Breaking News

बनावट एटीएम कार्डद्वारे 54 हजार लांबविले

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील पालखार येथील फिर्यादीच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून बनावट एटीएम कार्डचा वापर करून चोरट्याने 54 हजार रुपये लांबविल्याची घटना घडली आहे. पालखार येथील फिर्यादीचे बँक ऑफ इंडियाच्या गडब शाखेत बचत खाते असून  या खात्याचे फिर्यादीकडे एटीएम डेबिटकार्ड आहे. या खात्यामध्ये 53 हजार 515 रूपये रक्कम शिल्लक होते. 19 ते 22 डिसेंबर या कालावधीत अज्ञात आरोपीने एटीएमसारखे नविन कार्ड बनवून फिर्यादीच्या बँक खात्यातून वेळोवेळी एकूण 53 हजार 515 रोख रक्कम सातीवली (वसई) येथील एटीएम मशीनव्दारे काढून घेतली. याबाबत वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधीक तपास निरीक्षक बाळा कुंभार  करीत आहेत.

पेणमधील मोठे वढाव येथे चोरी

पेण : तालुक्यातील मोठे वढाव येथील उघड्या घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने दोन सोन्याच्या गंथन चोरून नेल्याची घटना घडली आहे. फिर्यादीच्या राहत्या घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून अज्ञात चोरट्याने  घरातून 75 हजार रूपये किंमतीच्या दोन सोन्याच्या गंथन चोरून नेल्या. याबाबत वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधीक तपास सुरू आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply