Breaking News

मृत्यूचा घाट सुरक्षिततेच्या मार्गावर; बोरघाटातील अपघात 50 टक्क्यांनी कमी, बळींची संख्याही घटली

खालापूर : अरुण नलावडे

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात प्रमाण कमी व्हावे, याकरता महामार्ग पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्याबरोबरच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या विशिष्ट वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याने 2020या वर्षामध्ये या महामार्गावरील  अपघातांचे प्रमाण 50 टक्क्याने घटले आहे. राज्यातील महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्य वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांनी वाहन चालकांचे प्रबोधन करण्याचे तसेच बेशिस्त वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचनादेखील उपाध्याय यांनी दिल्या होया. त्यानुसार महामार्ग पोलीस परिक्षेत्र संजय बालगुडे, महामार्ग पोलीस विभागाचे निरीक्षक सुदाम पाचोरकर पोलीस मदत केंद्राचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक जगदीश परदेशी व त्यांच्या पथकाने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणार्‍या बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. या मोहिमेअंतर्गत सन 2020 मध्ये इंटरसेप्टर वाहने अतिवेगाने वाहन चालवणार्‍या एक हजार 179 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एक्सप्रेस महामार्गावर वाहन चालविताना लेन कटिंग करणार्‍या 70 हजार 96 वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच एक्सप्रेस महामार्गावर व मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर लावणे हेल्मेट न वापरणे, महामार्गावर वाहतुकीस अडथळा होईल अशा रितीने अवैध पार्किंग करणे, नो एन्ट्रीतून वाहन चालवणे, धोकादायक रितीने वाहन चालवणे अशा व इतर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या एकूण 38 हजार 401 वाहनांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी वाहनचालकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्यात आले आहे. त्यामुळे बोरघाट केंद्राच्या हद्दीत अपघातांच्या प्रमाणात सन 2019-20 मध्ये एकूण 50 टक्क्यांनी घट झाली आहे. बोरघाट केंद्राच्या हद्दीमध्ये सन 2019 मध्ये 160 अपघातांच्या घटना घडल्या. त्यामध्ये 40जणांचा बळी गेला होता. मात्र महामार्ग पोलिसांनी विशेष मोहीम राबवून बेशिस्त वाहनचालकांवर जोरदार कारवाईला सुरुवात केल्यानंतर तसेच अपघातग्रस्तांना तात्काळ उपचार मदत मिळवून दिल्याने 2020 या वर्षामध्ये द्रुतगती महामार्ग तसेच मुंबई-पुणे महामार्ग हद्दीत 81अपघातांच्या घटना घडल्या. त्या मध्ये 30 जणांचा बळी गेला. 2019 मधील बळींच्या तुलनेत 25 टक्क्यांनी कमी अपघात झाले आहेत. तसेच जखमींच्या संख्येतही 56टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे. सन 2019 मध्ये 87 हजार 590 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करीत एक कोटी चार लाख 42 हजार 450रुपयांची दंड वसुली तर सन 2020 मध्ये एक लाख 45 हजार 676 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येउन एक कोटी 26 लाख 92हजार 650 दंड वसूल करण्यात आली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply