मुंबई : केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शुक्रवारी (दि. 8) महाराष्ट्रातील 30 जिल्हे व 25 महानगरपालिका क्षेत्रांत कोरोना लसीकरण ड्राय रन मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात तीन आरोग्य संस्था व प्रत्येक महानगरपालिकेत एक आरोग्य संस्था या ठिकाणी ड्राय रन घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली. क्षेत्रीय स्तरावर कोविड अॅपची उपयुक्तता तपासणे, लसीकरणाचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे या बाबींची पडताळणी व तपासणी, प्रत्यक्ष लसीकरण सुरू करण्यापूर्वी लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करणे, लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी-कर्मचार्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी ड्राय रन घेतला जातो, असे टोपे यांनी नमूद केले आहे.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …